Home राजकारण शेताकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!राज्य सरकार शेतकऱ्यांची जमीन भाड्याने घेणार?

शेताकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!राज्य सरकार शेतकऱ्यांची जमीन भाड्याने घेणार?

120

आज शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. सौरऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी वापरल्या जातील. शेतकऱ्यांना त्याबदल्यात मोबदला दिला जाईल. अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच १ एकरमागे ७५ हजार रुपये देणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितलं. पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी जमीन नापिक होण्यावर खंत व्यक्त करत केमकलच्या वापरामुळे काळ्या आईची रोग प्रतिकारशक्ती कमी झालीय. त्यामुळे महाराष्ट्र आणि भारत हळू हळू कॅन्सर कॅपटील होत आहे. कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढला आहे. आता आपल्याला नैसर्गिक शेतीकडे यावं लागेल. पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देत विषमुक्त शेतीली सुरुवात केलीयी. त्यासाठी एक प्लॅन तयार केला आहे. जवळपास यावर ३ हजार कोटी खर्च करण्यात येणार आहे. यातून आपली उत्पदक्ता वाढेल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला