नाशिक: काल जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन सुद्धा आज नाशिक जिल्ह्यातल्या कुठल्याही मार्केटमध्ये नाफेड कांदा खरेदीसाठी आले नाही. भावना समजून न घेता शेतकऱ्यांना फक्त शेंडी लावण्याचे काम सरकार करत आहे.असं स्वाभिमानी शेतकरी संघटचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी म्हटलं आहे.
बाजारातून चांगला भाव मिळत असताना 40 टक्के निर्यात शुल्क लावून केंद्र सरकारने कांद्याचे भाव पाडले. नाफेडची खरेदी ही अदृश्य शक्ती आहे जी जाणवतही नाही आणि दिसतही नाही. शेतकऱ्यांच्या पदरात काही पडावे असे सरकारला मनापासून वाटत असेल तर 40 टक्के निर्यात शुल्क हटवा. निश्चित कांद्याचे भाव चाळीस ते पन्नास रुपये किलो होतील. जर सरकारने निर्यात शुल्काचा निर्णय मागे घेतला नाही तर यापेक्षा अधिक तीव्र असंतोष शेतकऱ्यांचा तुम्हाला राज्यभर रस्त्यावरती दिसेल. असंहि स्वाभिमानी शेतकरी संघटचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप म्हणाले.
संदीप जगताप- प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना