सांगली जिल्ह्यात खत खरेदीसाठी ई-पॉसमधील सॉफ्टवेअरमध्ये खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जातीची माहिती द्यावी लागत आहे. या प्रकरणवरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. नेमकं काय म्हणाले अजित पवार?अहो शेतकरी आमची जात आहे. खते खरेदी करताना शेतकऱ्याना जात कसली विचारताय,” असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला. सांगलीचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला व सरकार जातीवाद निर्माण करू पाहतंय का? असा सवाल केला. “रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात का सांगावी लागत आहे. ती का नोंदवावी लागते आहे. ई पॉस सॉफ्टवेअर मशीनमध्ये जातीचा रखाना टाकण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना जात सांगावी लागते आहे. त्यामुळे जातीचे लेबल लावण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नये. अशा शब्दात अजित पवारांनी सरकारवर हल्लाबोल करत “या प्रकरणात कनिष्ठ अधिकारी बळीचे बकरे ठरु नये. कोण यामध्ये सहभागी आहे त्याच्यावर कारवाई करावी आणि जातीचे लेबल बंद करावे व याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे,” अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलीआहे.