Home क्राईम शेअर मार्केट च्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक प्रकरणी ४ जणांना अटक…! सीबीआय मुंबईची...

शेअर मार्केट च्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक प्रकरणी ४ जणांना अटक…! सीबीआय मुंबईची कारवाई 

117

कुडाळ: कुडाळ तालुक्यातील माणगांव मधील शेअर मार्केटच्या नावाखाली सुमारे 25 लाख ऑनलाईन फसवणूक मधील फरार चार आरोपींना अखेर अटक करण्यात यश आले आहे. ही कारवाई सीबीआय मुंबई ने केली असून यातील चारही आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हा गुन्हा 29 सप्टेंबर 2018 रोजी घडला होता .

कुडाळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार माणगांव येथील अजय नारायण चव्हाण यांनी कुडाळ पोलीसात २९ सप्टेंबर २०१८ रोजी तक्रार दिली होती. यानुसार एकूण 12 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये मध्यप्रदेश एक शेअर मार्केट कंपनीने शेअर मार्केटचे प्रशिक्षण देतो. तसेच यातून दाम दुप्पट पैसे मिळवून देतो सांगत पैसे स्विकारले होते. यानंतर या कंपनीने सांगितले प्रमाणे काहीच न करता फसवणूक केली होती . आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अजय चव्हाण यांनी कुडाळ पोलीसात तक्रार दिली होती. याप्रकरणी एकूण 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर 2020 मध्ये या प्रकरणी कुडाळ न्यायालयात चार्ट शिट दाखल करण्यात आले होते.यानंतर संबंधित संशयित फरार होते. हा तपास सीबीआय मुंबईकडे वर्ग करण्यात आला होता. यानंतर सीबीआय ने तपास करत गिरीश पहवानी रा भिवंडी मुंबई, लक्ष्मीकांत शर्मा रा.मध्य प्रदेश, हेमंत अग्रवाल रा इंदोर मध्य प्रदेश, स्वप्नील प्रजापती रा इंदौर मध्य प्रदेश यांना मोठ्या शिताफीने अटक करण्यात यश मिळवले आहे. यातील उर्वरित आठ आरोपी फरार असून त्याचा सीबीआय तपास करत आहे. या चौघांना कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.