Home शिक्षण शिष्यवृत्ती परिक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीचे घवघवीत यश

शिष्यवृत्ती परिक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीचे घवघवीत यश

179

आंबोली प्रतिनिधी: राज्य परिक्षा परिषद आयोजित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या विद्यार्थांनी शिष्यवृत्ती मिळवून घवघवीत यश मिळविले. रविवार दि. १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवीच्या कॅडेट ऋग्वेद राजन पाताडे व कॅडेट पार्थ निलेश सांडव हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत येऊन ते शिष्यवृत्तीस पात्र ठरले.

पार्थ निलेश सांडव

सैनिक स्कूलमध्ये एन.डीन.ए. परीक्षेची तयारी करत असताना हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा, डॉ. होमी भाभा परिक्षा, ऑलिंपियाड परिक्षा देतात. येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांसाठी  विशेष मार्गदर्शन केले जाते.

ऋग्वेद राजन पाताडे

शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अध्यक्ष सुनील राऊळ, संचालक जॉय डांटस, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, सर्व संचालक,प्राचार्य एन.डी.गावडे यांनी अभिनंदन केले आहे.