Home शिक्षण शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद! दर्पण प्रबोधिनीचे आयोजन

शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद! दर्पण प्रबोधिनीचे आयोजन

101

कणकवली प्रतिनिधी: दर्पण प्रबोधिनीच्या वतीने कणकवली येथे शिष्यवृत्ती आणि इतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन संस्थेचे प्रेरणास्थान उत्तम पवार यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त विद्यामंदिर येथे एक शैक्षणिक उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी देवगड येथील स.ह.केळकर काॅलेजचे प्राध्यापक डॉ. चंद्रकांत भेंकी यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन विध्यार्थ्यांना लाभले. उद्घाटनाप्रसंगी संस्थेचे प्रेरणास्थान उत्तम पवार यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लब कणकवलीचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर अशोक कदम यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सिंधुदुर्गची नवकविता या काव्यग्रंथात किशोर कदम यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षक आनंद तांबे यांचा यांचाही सत्कार करण्यात आला. विद्याधर तांबे यांचा प्राथमिक शिक्षक पतपेढी चे संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

दरवर्षी देण्यात येणारी उत्तम पवार स्मृती ज्ञानव्रती विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी दहावी आणि बारावीतील दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. शिवडाव गावची दहावीत ९३. ४० टक्के मिळवून उज्वल यश संपादन केलेली सृष्टी विद्याधर तांबे हिचा तसेच ओसरगाव येथील श्रुती अनिल येरलकर बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनी या दोन्हींचा ज्ञानवर्ती विद्यार्थी शिष्यवृत्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना दरमहा १००० रु शिष्यवृत्ती दिली जाते. यावेळी पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी सृष्टी तांबे हिने आपले मनोगत व्यक्त केले.

 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती देवून उपस्थित सर्व विद्यार्थी, पालकांचे स्वागत केले.तसेच डाॅ.अशोक कदम, विनायक जाधव यांनीही संस्थेच्या स्तुत्य उपक्रमाला सदिच्छा दिल्या.

कार्यक्रम प्रसंगी माजी अध्यक्ष राजेश कदम, निलम पवार, सचिव सुभाष कदम, सुनील तांबे , महिला फ्रंट अध्यक्ष स्नेहल तांबे, उपाध्यक्ष प्रज्ञा कदम, खजिनदार विशाल कासले, सहसचिव संदेश कदम, स्पर्धा परीक्षा प्रमुख दिलीप कदम, शिक्षक नेते विनायक जाधव, शिक्षक अजित कदम, प्रकाश बुचडे, सदस्य संतोष तांबे, महेंद्र कदम, विशाल हडकर, किशोर कदम,नितिन कदम, सल्लागार श्रीधर तांबे, डाॅ.व्ही.जी.कदम, दर्पण स्टुडंट चे राजा कदम, राजन तांबे, सदस्य अनिल तांबे, नेहा कदम, अनुष्का तांबे, सुनील हरकुळकर, श्रद्धा कदम, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक राजेश कदम यांनी केले,प्रास्ताविक सुभाष कदम तर स्नेहल तांबे यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.