१३ जून वार्ता: मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेनेच्या बैठकीत किर्तीकर बोलतांना म्हणाले की, शिवसेनेच्या ४० आमदारांमुळं भाजप पुन्हा सत्तेत आहे, असं विधान शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केलं आहे. भाजपच्या दबावतंत्राला उत्तर देताना त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. किर्तीकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार एकत्र आल्यानं भाजप पुन्हा एकदा सत्तेत आली आहे. शिवसेनेचे ४० आमदार सोबत होते म्हणून मविआची सत्ता उलथून टाकली, त्यामुळं या आपली ताकद ओळखावी, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंना सत्तेतून पायउतार केलं आणि शिंदेंना मुख्यमंत्रीपदावर बसवलं. त्यामुळं आपण सर्वांनी एकत्र आणि ताकदीनं राहिलं पाहिजे, असा सल्लाही यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन किर्तीकरयांनी दिला आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना विरोध दर्शवला असून याठिकाणी भाजपचाच उमेदवार दिला जाईल, असा ठरावही मांडला होता. त्यामुळं या अंतर्गत राजकारणाला वैतागून श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देण्याची इच्छाही व्यक्त केली होती.







