Home स्टोरी शिवसेनेकडून कोकणात गणेशोत्सवासाठी विनामूल्य गाड्या सोडण्यात येणार !

शिवसेनेकडून कोकणात गणेशोत्सवासाठी विनामूल्य गाड्या सोडण्यात येणार !

144

मुंबई :– कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी शिवसेनेकडून (शिंदे गट) एस्.टी.च्या गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांचा व्यय शिवसेनेकडून देण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक मतदारसंघातून या बसगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. याविषयी २० ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी बैठक पार पडली.

याविषयीची नोंदणी आणि गाड्या सोडण्याचे वेळापत्रक लवकरच घोषित करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली. यासह कोल्हापूरमार्गे कोकणात जाणार्‍यांसाठी ‘टोल’ न घेण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. यामध्ये मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि अन्य पथकर नाके यांवरील पथकर माफ करण्यात येणार आहे. या बैठकीला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे  उपस्थित होते.