सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी खा. विनायक राऊत यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब….
पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक….
सिंधुदुर्ग: शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी रविवारी मातोश्रीवर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत शिवसेना संघटनेचा त्यांनी आढावा घेतला व मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ दे चर्चा अभियान चांगल्या पद्धतीने राबविल्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी खा. विनायक राऊत यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असून उद्धवजी ठाकरे लवकरच सिंधुदुर्ग दौऱयावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, संग्राम प्रभुगावकर, अमरसेन सावंत, हरी खोबरेकर, बाबुराव धुरी, रुपेश राऊळ, शैलेश परब, राजू नाईक, सचिन सावंत,बंडू ठाकूर, उत्तम लोके, आदींसह सिंधुदुर्ग जिल्हयातील शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.