Home राजकारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली राष्ट्रवादीचे शरद पवार यांची भेट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली राष्ट्रवादीचे शरद पवार यांची भेट

174

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक राज्य सरकारने  बोलावली होती. त्यामध्ये बरेच महत्त्वाचे निर्णय झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातील माहितीही दिली. तसेच आंदोलन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका जाहीर करताना सरकारला १ महिन्याचा वेळ देण्यास मान्य केले.

परंतु, जरांगे पाटलांनी बऱ्याच अटीही घातल्या आहेत.  मराठा आरक्षणाचा विषय केंद्रस्थानी आहे. आणि दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाशी भेट घेतली आहे.

राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत जात आहेत. तर मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहेच , परंतु आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणीलाही १४ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठया प्रणणात फूट पडली आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीकडून आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आले. तसेच या दोन्ही आमदारांच्या अपात्रेवरील याचिकेवर विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणी सुरू होत आहे. यामुळेच उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे समजते. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत हे देखील उपस्थित होते.