७ जुलै वार्ता: शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलम गोऱ्हें यांच्या पक्ष प्रवेशाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना भाजप युती किती मजबूत आहे, हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे. बाळासाहेब, अटलजी या सर्वांना अभिप्रेत असलेली युती आहे. राज्यात देखील शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन व्हावे ही जनतेची इच्छा होती. त्यामुळे वर्षभरापासून देवेंद्र फडणवीस आणि मी कामांचा धडाका लावला. ज्याची चर्चा सगळीकडे होऊ लागल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. २०१४ ते २०१९ मध्ये सरकार युतीचे होते. त्यावेळेला आम्ही महत्वाचे निर्णय घेतले. त्यानंतर सरकार गेल्याने सर्व प्रकल्प मागे पडले. पण आता आम्ही पुन्हा सत्तेत आल्याने लोकहिताचे बंद झालेल्या प्रकल्पांना आम्ही चालना दिली. हे निर्णय राज्याच्या समोर असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
सरकार स्थापन झाल्यानंतर विविध जिल्हा आणि तालुक्यातील पदाधिकारी, आमदार, खासदार येत आहेत. घटनात्मक पदावर काम करत असताना निलम गोऱ्हे यांनी इच्छा व्यक्त केली. महिलांच्या विकासासाठी काम करायचे असल्याचे निलम गोऱ्हे यांनी सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.