कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने आयोजन
शिवसेना, युवासेना, महिलाआघाडी, युवतीसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शनिवार २१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे हा सत्कार सोहळा होणार आहे. त्याचबरोबर उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल जान्हवी सावंत यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.
यावेळी शिवसेना उपनेते,जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, बाळा भिसे, संग्राम प्रभुगावकर, युवतीसेना समन्वयक शिल्पा खोत आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी कुडाळ मालवण मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, व युवतीसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे यांनी केले आहे.