Home Uncategorized शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ तालुक्याचा शिवगर्जना मेळावा…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ तालुक्याचा शिवगर्जना मेळावा…

68

महालक्ष्मी हॉल येथे आणि मालवण तालुक्याचा शिवगर्जना मेळावा समर्थ हॉल कोळंबा येथे संपन्न झाला. या मेळाव्याचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. पुष्पगुच्छ देऊन सुभाष देसाई यांचे आमदार वैभव नाईक यांनी स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी पक्ष संघटना वाढीस संदर्भात आपले विचार व्यक्त करत मार्गदर्शन केलं. तसेच उपनेते अरुण बुधवडकर, पक्ष समजदार प्रदीप बोरकर, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, युवानेते अतुल रावराणे, उपजिल्हाप्रमुख अमरसिंग सावंत, महिला जिल्हाप्रमुख जानवी सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख उपनगराध्यक्ष मंदार, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, तालुकाप्रमुख सचिन कदम, बाळापुर गावकर, महिला तालुकाप्रमुख स्नेहा दळवी, मथुरा राऊळ, अतुल बंगे, श्रेया परब, संतोष शिरसाट, जय भारत पालक, रुपेश पावस्कर, अवधूत मालकर तसेच दोन्ही तालुक्यातील उपसर प्रमुख विभागप्रमुख उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख प्रमुख जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगरपरिषद व ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिवसेना लोकप्रतिनिधी निमंत्रित पदाधिकारी सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन सोसायटी सदस्य तसेच पुरुष व महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.