Home स्टोरी शिवसंस्कारच्या आंतरराज्य स्पर्धाचा निकाल जाहीर!

शिवसंस्कारच्या आंतरराज्य स्पर्धाचा निकाल जाहीर!

176

सावंतवाडी प्रतिनिधी:

किल्ले रायगडवर ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा न भूतो न भविष्यती असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. या राज्याभिषे- काने महाराज सार्वभौम राजे बनले. सोहळ्याच्या स्मृतीनिमित्त यंदाचे वर्ष हे श्रीशिवराज्याभिषेक म्हणून राज्यभरात साजरे केले जात आहे. त्याप्रित्यर्थ शिवसंस्कारतर्फे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात आंतरराज्य रांगोळी, निबंध व समुहगीत गायन स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यात रांगोळी स्पर्धा खुला गट- विषय – छत्रपती शिवाजी महाराज, शिवराज्याभिषे प्रथम सोनिया रमेश खुणे, पुणे. द्वितिय क्रमांक राम सूर्यकांत बिववणेकर, तृतीय क्रमांक अजित तुकाराम बिले, कोल्हापूर यांनी तर लहान गट प्रथम क्रमांक- पियुषा उमाजी राणे, सावंतवाडी, सिंधुदुर्ग द्वितीय क्रमांक – रेश्मा शिरोडकर मळगांव, सिंधुदुर्ग – तृतीय क्रमांक केतकी धोंडू सावंत, मळगांव, सिंधुदुर्ग, उत्तेजनार्थ स्वराज गजानन पाटील, फोंडा, गोवा यांनी प्राप्त केला आहे.

 

निबंध स्पर्धा खुला गट शिवराज्याभिषेक सोहळा प्रथम क्रमांक अनिकेत लक्ष्मण सावंत बांदा, सिंधुदुर्ग, द्वितिय क्रमांक – चैताली चेतन बिडये.

 

कणकवली, सिंधुदुर्ग तृतीय क्रमांक सौरभ सुनील जोशी उदयपुर, राजस्थान यांनी तर समूहगीत गायन स्पर्धा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या एकाच गीतासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रथम क्रमांक- भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी चराठे आंतरराष्ट्रीय शाळा नं. १ चराठा, द्वितिय क्रमांक – खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा, तृतीय क्रमांक – स्वराज आणि साथीदार उसगांव तिस्क, गोवा यांनी प्राप्त केला.

 

रांगोळी स्पर्धा खुल्या गटासाठी असताना सुद्धा लहान गटातील मुलांनी उत्साही सहभाग नोंदवला त्याबद्दल संस्थेच्या डॉ. सोनल लेले, गणेश ठाकुर, प्रा. सुभाष गोवेकर, अॅड. सोनू गवस, प्रारूपेश पाटील, संदेश देसाई व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

 

तसेच बेळगांव येथील ३ वर्षे वयाच्या शिवन्या भोसले पाटील व ४ वर्षे वयाच्या वयाच्या विराज पाटील यांनी पारंपारिक वेशभूषेत समूहगीत गाऊन सर्वांना आकर्षित करून घेतले. विजेत्या सर्वांना ‘शिवसंस्का- रच्या वार्षिक सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे असे डॉ. सोनल लेले यांनी कळविले आहे.