सावंतवाडी प्रतिनिधी: मराठा समाजाकडून यावर्षीही रांगनागडाच्या पायथ्याशी वृक्षारोपण व बीजरोपण कार्यक्रम करण्यात आला. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त १०० झाडे लावण्यात आली व वेगवेगळ्या प्रकारची २००० बीज रोपण करण्यात आले. त्यामध्ये गुलमोहर, चिंच, शेवगा, हिरडा, चंदन, बेल, रक्तचंदन,अर्जुना, सागरगोटा, पिंपळ, वड, बाहारा,आवळा, पळस या प्रकारची झाडे व बीजे लावण्यात आली. यामध्ये सावली देणारी झाडे, पशुपक्षी व अन्य जनावरे यांच्यासाठी लागणारे फळे व पाला यांची झाडे, आयुर्वेदिक झाडे व इमारती लाकूड त्यांची बीजे व वृक्ष रोपण करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत,जिल्हा समन्वयक बंड्या सावंत, खरेदीविक्री संघाचे चेअरमन दीपक नारकर, मराठा शिक्षक मंडळाचे जिल्हाध्यक्ष दिनेश म्हाडगुत, विध्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनुपसेन सावंत, मराठा समाज युवक तालुका अध्यक्ष शैलेश घोगळे, सोशल मीडिया प्रमुख हर्षद पालव तसेच मराठा समाजाचे कार्यकर्ते आशिष काष्टे, दीप्ती मोरे, गणेश पवार, दिनेश घोगळे, प्रसाद नेरकर, सिद्धेश घोगळे साईनाथ पवार उपस्थित होते.