सावंतवाडी प्रतिनिधी: अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात ज्या राजाचे नाव आदरस्थानी आहे अश्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी जगभरात मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. याच निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्यातील सिंधू रनर टीमने एक आगळा वेगळा उपक्रम राबवला. शिवजयंती निम्मित सिंधू रनर टीम ने किल्ले सिंधुदुर्ग (मालवण) ते सावंतवाडी (आरमार) सुमारे 66 किलोमीटर अंतर 22 धावकांनी न थांबता तब्बल ७ तास आणि ४० मिनिटात हाती शिवज्योत घेऊन पार केले. सिंधुदुर्ग किल्ल्या विषयी कवी भूषण यांनी खालील पंगती लिहिल्या आहेत
“सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मान तारा ।
जैसे मंदिराचे मंडन,श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार ।
चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले ।”
सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यातून अनेक शिवप्रेमी किल्ले सिंधुदुर्ग (मालवण) येथून शिवज्योत प्रज्वलित करून आपापल्या शहरात जातात. या वर्षी सिंधुदुर्ग जिल्यातील सिंधू रनर टीमने हि ज्योत सलग धावून आणि सुरवात ते शेवट म्हणजे मालवण ते सावंतवाडी हे ६६ किलोमीटर अंतर तब्बल ७ तास आणि ४० मिनिटात पूर्ण करून नवीन इतिहास घडवला आणि एकत्रित रित्या एवढे लांबचे अंतर मशाल हाती घेऊन धावणारे शिवरायांचे पहिले मावळे ठरले.
१८ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री १०:३० वाजता हे धावक शिवज्योत घेऊन मालवण वरून सावंतवाडी करीत निघाले या वेळेस त्यांना प्रोत्सहन देण्यासाठी सौ शिल्पा यतीन खोत (युवती सेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, श्री यतीन खोत (माजी नगरसेवक मालवण नगरपालिका), ह्यूमन राईट्स अससोसिएशन मालवण तालुका अध्यक्ष श्री सुधीर धुरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मालवणहून निघाल्या नंतर चौके, कट्टा, ओरोस, कुडाळ, झाराप मार्गे १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८:०० वाजता हे सर्व धावक सावंतवाडी मध्ये दाखल होताच त्यांचे स्वागत सावंतवाडी तालुका जुडो कराटे अससोसिएशन अध्यक्ष श्री वसंत जाधव सर आणि त्यांच्या लहान कराटे वीरांनी केले. गवळी तिठा येथून हि मशाल घेऊन सावंतवाडीतील जुडो कराटे प्रक्षिक्षण घेणारी लहान मुले आणि सिंधू रनर टीम चे धावक यांनी संपूर्ण मोतीतलावा भोवती फिरवून, याची सांगता सावंतवाडी राजवाडा येथे केली. सावंतवाडी संस्थान चे युवराज लखमराजे भोसले यांनी या साहसी उपक्रमात स%E