Home स्टोरी शिरोडा येथे शिखर कलश व श्री देव परमनाथ संप्रेक्षण विधी स्थापना सोहळ्याला...

शिरोडा येथे शिखर कलश व श्री देव परमनाथ संप्रेक्षण विधी स्थापना सोहळ्याला उत्साहात सुरुवात

149

शिरोडा: एट पोस्ट आरवली, शिरोडा येथे श्री अवधूत एनजी यांच्या घराजवळ श्री देव वेतोबा सातेरी, श्री भगवती देवी या देवतेंच्या कृपा आशीर्वादाने, श्री देव परमनाथ शिखर कलश संप्रेक्षण विधी सोहळा संपन्न होत आहे. या निमित्ताने पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज या कार्यक्रमाचा दुसरा दिवस अनेक भाविकांच्या उवस्थितीत उत्साहात साजरा झाला.

वैशाख शुक्ल पक्ष सोमवार, १ मे २०२३ रोजी ते बुधवार ३ मे २०२३ रोजी पर्यंत धार्मिक विधी संपन्न होत आहे. वैशाख शुक्ल पक्ष, एकादशी, सोमवार, १ मे २०२३ सकाळी ७:३० ते दुपारी १ वाजेपर्यंत यजमान प्रायश्चित्त, शरीर शुध्दी, गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राध्द आचार्यवरण, प्राकारशुध्दी, संप्रेक्षण विधान आरती व नैवेध्य हे कार्यक्रम भाविकांच्या उवस्थितीत संपन्न झाला.

वैशाख शुक्ल पक्ष, त्रयोदशी, बुधवार दि. ३ मे २०२३ रोजी सकाळी ८:०० वाजता श्री सत्य नारायण महापुजा, आरती व तीर्थ प्रसाद चे आयोजन कारण्यात आले आहे.या सपुर्ण कार्यक्रमासाठी सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहुन ईश्वरी कृपेचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त येनजी परिवाराकडून कारण्यात आले आहे.