Home स्टोरी शिरूर लोकसभेतील तालुक्याच्या शाश्वत विकासावर भर द्यावा! खासदार अमोल कोल्हे

शिरूर लोकसभेतील तालुक्याच्या शाश्वत विकासावर भर द्यावा! खासदार अमोल कोल्हे

80

१६ मे वार्ता: लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळं पिंपरी चिंचवडच्या बाजूचा भागासाठी वेगळा जिल्हा निर्माण करावा आणि त्या जिल्ह्याला शिवनेरी असं नाव द्यावं, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्यावर एबीपी माझाशी बोलताना अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे जिल्ह्याची विभागणी करून, शिवनेरी जिल्ह्याची निर्मिती करून सर्व सामान्यांच्या जीवनमानावावर काही फरक पडणार आहे का? की ही केवळ राजकीय मागणी आहे? असा प्रश्न शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. उलट जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या शिरूर लोकसभेतील तालुक्याच्या शाश्वत विकासावर भर द्यावा, अशी मागणी कोल्हे यांनी केली. पुणे जिल्ह्याचे विभाजन करावे. .

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, जिल्ह्यासाठी खर्ची जाणारा निधी विकासासाठी वापरला जावा. शिवनेरी नावाला विरोध नाही फक्त मागणीमागची व्यवहार्यता तपासायला हवी, असं कोल्हे यांनी सूचित केलं. याआधी बारामती जिल्ह्याची ही मागणी झाली होती, सोबतच शिरूर लोकसभेवर भाजपचा डोळा आहे. त्या अनुषंगाने शिवनेरी जिल्ह्याची मागणी केली जातीये का? याबाबत ही कोल्हे यांना विचारलं असता त्यांनी स्पष्टपणे उत्तरं दिली आहेत. ते म्हणाले की, जिल्ह्याची मागणी करण्यापेक्षा विकासाकडे लक्ष द्या.