Home स्टोरी शिरीष कणेकर काळाच्‍या पडद्याआड!

शिरीष कणेकर काळाच्‍या पडद्याआड!

121

२६ जुलै वार्ता: ज्‍येष्‍ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचे वयाच्‍या ८० व्‍या वर्षी निधन झाले आहे. खास शैलीतून टोकदार, तसेच उपाहासात्‍मक लिखाण करणारे शिरीष कणेकर यांचे अनेक चाहते आहेत. ते सामाजिक समस्‍यांवर विनोदी शैलीतून बोट ठेवत. चित्रपट, क्रिकेट आणि राजकारण हे त्‍यांच्‍या लिखाणाचे प्रमुख विषय होते. अत्‍यंत खुमासदार लिखाणाच्‍या पद्धतीमुळे ते प्रसिद्ध होते. जवळजवळ सर्वच प्रसिद्ध इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रे अन् नियतकालिके यांतून त्‍यांनी विपुल स्‍तंभलेखन केले. ‘लगाव बत्ती’ या कथासंग्रहाला महाराष्‍ट्र साहित्‍य परिषदेचा आणि उत्‍कृष्‍ट विनोदी वाङ्‍मयाचा ‘चिं.वि. जोशी’ पुरस्‍कारही त्‍यांना मिळाला होता.