Home शिक्षण शिरशिंगे गावाचा कौतुकास्पद उपक्रम.

शिरशिंगे गावाचा कौतुकास्पद उपक्रम.

183

सावंतवाडी: गावातील माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ शिक्षणप्रेमी, माजी सैनिक, तरुणमंडळ यांच्या वतीने शिरशिंगे गावातील प्राथमिक व माध्यमिक -अशा चार शाळांमध्ये. मुलांच्या गरजेनुसार शैक्षणिक साहित्याचे वितरण करवाते आले. गेली सात वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे. माजी उपसंरपच श्री. पांडुरंग म. राऊळ यांच्या कल्पनेतून व पुढाकाराने या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या गावातील मुले परिस्थितीमुळे शिक्षणपासून वंचित राहू नयेत, शाळेत आलेली मुले टिकली पाहिजेत व शिकली पाहिजेत. या उद्दे‌शाने होतकरू व हुशार मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक दाते पुढे सरसावले आहेत.

शैक्षणिक साहित्य वितरण प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा माधवी म. राऊळ, प्रमुख पाहुणे- सुकाणू समिती सदस्य भरत गावडे, उपाध्यक्ष फटू राऊळ, पांडुरंग राऊळ, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण राऊळ, बाबाजी धोंड, समीर धोंड, राजेश गोवेकर, तुकाराम राऊळ, उपस्थित होते.

यावेळी भरत गावडे म्हणाले, शिरशिंगे गावाचा आदर्श इतर गावाने घ्यावा म्हणजे गावा-गावात शैक्षणिक वातावरण निर्माण होईल, मुले’ आनंदाने शिक्षण घेतील. व कृतज्ञतेची भावना वाढीस लागेल.

 

या कार्याला दातृत्व करणारे अनिल सो. राऊळ, महेश गोवेकर उत्तम वि. राऊळ, ज्ञानेश्वर म. राऊळ, अनंत रा. राऊळ, संजय तुः राउळ, संतोष भि. राऊळ, सीताराम शिर्के, पांडुरंग मः राऊळ, सुधाकर म. राऊळ, महेश निकम, शिरीष मेस्त्री, विजय ल. राऊळ, उदय स. राऊळ, बापू भि. राउळ, वासुदेव आ. राऊळ, महादेव ज. राऊळ, विलास राऊळ, समीर धोंड, तुकाराम रा. राऊळ या दात्यानी भरघोष देणगी देऊन सहकार्य केले.

 

यावेळी श्री अवधुतानंद सेवा ट्रस्ट, धवडकी या संस्थेच्या वतीने जि.प.शाळा शिरशिंगे या संस्थेच्या शाळेतील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. मुख्याध्यापिका संगीता सोनटक्के, नीता सावंत, सौ. परब, सौ. रिया सांगेलकर यांनी शाळेला कपाट भेट म्हणून दिले. प्रास्ताविक सोनटक्के यांनी केले तर आभार रिया सांगेलकर हिने मानले.