Home स्टोरी शिमला येथे भुस्खलनामुळे २१ जणांचा मृत्यू!

शिमला येथे भुस्खलनामुळे २१ जणांचा मृत्यू!

235

१४ ऑगस्ट वार्ता: शिमला येथे भुस्खलन आणि दरडी कोसळल्या आहेत. भुस्खलन झाल्याने शिव मंदिर ढासळले आहेत. भुस्खलनामुळे २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली ५० भाविक दबले आहेत. त्या आधी सोलनमध्ये ढगफुटी झाल्याने सात लोकांचा मृत्यू झाला होता. तर मंडीच्या पराशर बागी येथे पूल वाहून गेल्याने २५० लोक त्याखाली दबले होते. उत्तराखंडमधील मालदेवतामधील डेहराडून डिफेन्स महाविद्यालयाची इमारत ढासळली आहे. राज्यातील सहा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज सकाळी या मंदिरात काही लोक पूजा करण्यासाठी आले होते. अचानक मंदिर ढासळल्याने २० लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, यटा ठिकाणाहून २१ मृतदेह बाहेर काढल्याने मंदिराच्या ढिगाऱ्याखाली अधिक लोक दबले गेले असल्याची शक्यता आहे. दरम्यान, ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.