सावंतवाडी प्रतिनिधी: कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने यंदाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार कारिवडे येथील परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय येथील इंग्रजी विषय शिक्षिका सौ. अर्चना संतोष सावंत यांना विधान परिषदेचेपदवीधर शिक्षक आमदार निरंजन डावखरे यांच्या शुभहस्ते देण्यात आला. राज्यस्तरीय शिक्षण परिषद कार्यक्रमात शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आले.
यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे राज्य अध्यक्षआकाश तांबे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष वामन तर्फे प्राथमिक शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, गटशिक्षणाधिकारी संजय माने, संतोष गोसावी, अनिल राणे दिलीप, शितोळे संभाजी थोरात, आनंद तांबे, सुधीर तांबे, महेश कांबळे, गोकुळ वाघ, प्रशांत बोर्डे, गौतम वर्धन, पारस जाधव, राजेंद्र वाघमारे, प्रभाकर पारवे, वंदना भामरे, शिक्षण विस्तार अधिकारी सौ. दळवी, किरण मानकर, बाजीराव प्रज्ञावंत, नरेंद्र मोरे, श्रीशैल कोरे, राहुल गायकवाड, प्रदीप वाघोदे, सखाराम कांबळे, संजय राठोड, भरत ठाकूर, माणिक वंजारे, श्रीकांत शिरसाट, संदीप कोळपे, संभाजी कोरे, लाडू जाधव, समीर नाईक, अनिल कांबळे,मिलिंद मेस्त्री, अनिल कांबळे (शिक्षक नेमळे), सुधीर तांबे,समीर नाईक, सरचिटणीस संजीव मोहिते , anil कांबळे एन पी कांबळे , मारुती कांबळे, अजिंक्य तांबे, आधी उपस्थित होते.
यावेळी शिक्षण क्षेत्रातील शिक्षक कर्मचारी वर्ग मुख्याध्यापक आदींचाही सत्कार करण्यात आला. या संघटनेतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका राज्यस्तरीय पुरस्कार सौ.अर्चना सावंत यांच्या शिक्षण क्षेत्रातील २५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेबद्दल सन्मान करण्यात आला आहे. या शिक्षिकेने विनाअनुदानित तत्त्वावर जवळपास २० वर्ष होऊन अधिक काळ काम केले आहे. कठीण परिस्थितीत विद्यादान करत. ग्रामीण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आदर्शवत घडवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. शंभर टक्के अनुदानित शाळां च्या दर्जेदार असे आदर्शवत कार्य ते करत आहेत. त्याबद्दल संघटनेने त्यांना आदर्श शिक्षिका सन्मान देऊन गौरव केला आहे. टप्पा अनुदानित शाळांवर आदर्शवत असे कार्य त्या करत आहेत. आतापर्यंत त्यांनी आपल्या शिक्षण सेवेतील २५ वर्ष च्या कालावधीत शैक्षणिक सामाजिक तसेच विविध उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या या कार्याचा विचार करून त्यांना सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी मुख्याध्यापक फादर सालदाना, कळसुल कर हायस्कूलचे वरिष्ठ लिपिक वैभव केकरे, शांती निकेतन इंग्रजी माध्यमच्या हायस्कूलचे एस. परब, प्राथमिक शिक्षक कवी विठ्ठल कदम, आदर्श शिक्षक श्री. अनिल कांबळे, शिक्षक कर्मचारी लाडू जाधव आधींचा सन्मान गौरव श्री डावखरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्श शिक्षक आहेत. त्यामुळे त्या जिल्ह्याचा दहावी, बारावीचा निकाल दरवर्षी शंभर टक्के लागत आहे. या जिल्ह्यात निवासी शाळा लवकरच सुरू केली जाईल. ज्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी आदर्शवत शिक्षक हा नेहमी विद्यार्थी घडवण्याचे कार्य करत असतो. ते गुरुवर्य आहेत. आता लवकरच येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण सुरू होणार आहे. काळा बरोबर बदलायला शिकायला हवे. असे ते म्हणाले. यावेळी राज्य संघटनेचे अध्यक्ष आकाश तांबे यांनी राज्यस्तरीय शिक्षण परिषद या जिल्ह्यात घेण्यात आली. निश्चितपणे शिक्षकांच्या समस्या व अडचणी सोडवण्याचे कार्य या संघटनेमार्फत आतापर्यंत करत आलो आहोत. यापुढेही केले जाईल. असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनराजेश कदम तर आभार जिल्हा अध्यक्ष सुधीर तांबे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक कर्मचारी वर्ग उपस्थित होते.