Home स्टोरी शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी पुरस्काराने देवयानी आजगावकर सन्मानित….!

शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी पुरस्काराने देवयानी आजगावकर सन्मानित….!

187

सावंतवाडी, दि. ८: अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवणतर्फे दिला जाणारा शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी पुरस्कार शिक्षिका देवयानी त्रिंबक आजगावकर यांना आचरे हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर हडप होते. तसेच यावेळी निवड समितीचे अध्यक्ष सदानंद कांबळी, साने गुरुजी कथामाला, मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, पेंढऱ्याची वाडी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष गौरी फटनाईक, कथामाला सचिव सुगंधा गुरव, मागील नऊ वर्षातील पुरस्कार विजेते, कोमसाप सदस्य, कथामाला सदस्य, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, जिल्हाभरातील साने गुरुजी कथा मालेचे पदाधिकारी व दत्तात्रेय हिर्लेकर गुरूजी कुटुंबीयांसह उपस्थित होते.

 

पुरस्कारविजेत्या सौ. आजगावकर यांची मुटाट- पाळेकरवाडीतील पहिल्या शाळेची विद्यार्थीनी प्रणाली सावंत, मातोंड बांबर क्र.५ ची भक्ती पुराणिक व सध्या कार्यरत शाळेतील विद्यार्थीनी साईशा फटनाईक, शाळेतील शिक्षक श्री. तेंडोलकर, श्री. काळोजी, आजगावकर कुटुंबीय, माता पालक रत्नप्रभा गावडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

 

सौ. देवयानी आजगावकर यांना शाल , श्रीफळ, सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र, पुष्पगुच्छ व पाच हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण कोचरेकर यांनी केले. विजय चौकेकर यांनी आभार मानले. सन्मानचिन्ह वाचन मधुरा माणगावकर यांनी केले.

 

कार्यकमाचे अध्यक्ष श्री. हडपसर, अनन्या पुराणीक, साईशा फटनाईक या विद्यार्थीनी, सहकारी शिक्षक मुकुंद काळोजी, त्रिंबक आजगावकर, निवड समितीचे अध्यक्ष सदानंद कांबळी, जी.टी. गावकर यांचे कुटुंबीय श्री. गावकर यांनी मनोगत व्यक्त करून देवयानी आजगावकर यांच्या कार्याची माहिती दिली. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याचा उल्लेख करून अभिनंदन केले. श्री. हीर्लेकर यांनी शाल, श्रीफळ देऊन वैयक्तिक सत्कार केला. साईशा फटनाईक हिच्या वक्तृत्वावर प्रभावित होऊन तिला सन्मानित केले.