Home स्टोरी शिक्षक समितीने जोपासली सामाजिक बांधिलकी..!

शिक्षक समितीने जोपासली सामाजिक बांधिलकी..!

180

सावंतवाडी: तालुक्यातील इन्सुली गावात असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इन्सुली नंबर दहा या शाळेतील विद्यार्थीनी दृष्टी दीपक नेवगी हिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. तिच्या राहत्या घराला विजेच्या शॉर्टसर्किट मुळे आग लागली होती व त्यात या नेवगी कुटुंबाचं अतोनात नुकसान झाले होते. या मुलीचे वडील श्री. दीपक नेवगी हे मोलमजुरी करून चरितार्थ चालवतात.

नेवगी कुटुंबावर ओढवलेल्या या संकटात एक मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सावंतवाडीने आर्थिक स्वरुपात मदतीचे आवाहन केलेले होते, त्याला समिती शिलेदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ही जमा रक्कम शिक्षक समिती सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री. समीर जाधव,  यांनी श्री. दीपक नेवगी यांच्याकडे आज सुपूर्द केली.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक अध्यक्ष श्री. नारायण नाईक, म. रा. प्राथ. शिक्षक समिती सिंधुदुर्ग जिल्हा सचिव श्री.तुषार आरोसकर, सावंतवाडी सचिव श्री. हेमंत सावंत, तसेच श्री. गोविंद शेर्लेकर, श्री. प्रसाद डेगवेकर, श्री. सुधीर गावडे, श्री. प्रसाद दळवी, इन्सुली दहा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. सुषमा गावडे आदी समिती शिलेदार उपस्थित होते