Home स्टोरी शिक्षक भारतीच्या वतीने ज्येष्ठ शिक्षिक निवेदिता नारकर यांचा सेवानिवृत्तीपर जीवनगौरव..!

शिक्षक भारतीच्या वतीने ज्येष्ठ शिक्षिक निवेदिता नारकर यांचा सेवानिवृत्तीपर जीवनगौरव..!

95

सावंतवाडी: तालुक्यातील चौकुळ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मराठी भूगोल विषयाच्या शिक्षिका सौ.निवेदिता नारकर या त्यांच्या नियत वयोमानानुसार 31 मार्च 2024 रोजी 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या.

सौ. नारकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभात शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

दोडामार्ग न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज दोडामार्गपासून त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्यास आरंभ केला व उर्वरित सेवा चौकुळ इंग्लिश स्कूल व जूनियर कॉलेजमध्ये केली. मागील 33 वर्षाच्या कालावधीत त्यांनी अनेक जिल्हास्तरीय राज्यस्तरीय प्रशिक्षणे केली. शिवाय बोर्डाच्या मराठी विषयाच्या मॉडरेटर म्हणूनही त्यांनी काम केले.

या सत्कार सोहळ्यात शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे अध्यक्ष माननीय श्री संजय वेतुरेकर सर यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला तसेच त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य हे अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त केली व त्यांच्या पुढील भावी आयुष्यास् शुभेच्छा दिल्या. यावेळी आपल्या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना सौ नारकर मॅडम व त्यांचे यजमान श्री नारकर यांनी संघटनेच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. व या मानाचा सन्मान करत संघटनेसाठी रुपये 5000 ची भरघोस मदत केली व भावी काळातही संघटनेच्या कार्यास हातभार लावण्याची भावना व्यक्त केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर, जिल्हा सचिव समीर परब, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर ,संघटना माजी सचिव चौकेकर सर ,दीपक तारी सर ,महिला आघाडी सचिव सौ प्रगती आडेलकर ,सावंतवाडी तालुकाध्यक्ष सौ शारदा गावडे, दोडामार्ग तालुका अध्यक्ष शरद देसाई, विजय ठाकर सर ,विद्यानंद पिळणकर ,कुडाळ तालुका अध्यक्ष श्री माणिक पवार , वाय ए सावंत सर ,एस के कांबळे सर ,सेगा पाडवी सर, मेमाणे ,श्री लोखंडे सर श्री अनिकेत वेतुरेकर सर अनिल ओतारी सर, श्री सुनील जाधव, अरुण गवस सर, प्रेमनाथ गवस सर, श्री गावडे सर ,एस एस पाटील सर यांच्यासह अनेक शिक्षक भारती संघटनेचे शिलेदार उपस्थित होते.