Home स्टोरी शिक्षक भारतीच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष पाताडे यांची फेरनिवड! शिक्षक भारतीची त्रैवार्षिक जिल्हा कार्यकारणी...

शिक्षक भारतीच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष पाताडे यांची फेरनिवड! शिक्षक भारतीची त्रैवार्षिक जिल्हा कार्यकारणी जाहीर . 

49

मालवण प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष पाताडे यांची फेर निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा सरचिटणीस पदी मंगेश खांबाळकर यांची निवड करण्यात आली. जिल्हा अधिवेशनात ही निवड करण्यात आली. राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नासाठी नेहमी रस्त्यावर उतरणारी संघटना म्हणजे शिक्षक भारती संघटना. या संघटनेचे जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशन नुकतेच पार पडले. शिक्षणसेवक रद्द करा या ठरावासह 21 ठराव या अधिवेशनात मांडण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष संतोष पाताडे यांनी तीन वर्षात केलेल्या कामाच्या आधारे त्यांची पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदि निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा सरचिटणीस पदी मंगेश खांबाळकर यांची तर कार्याध्यक्षपदी विजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीची जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे – जिल्हाध्यक्ष- संतोष पाताडे, जिल्हा सरचिटणीस- मंगेश खांबाळकर, कार्याध्यक्ष- विजय जाधव, जिल्हा मुख्य सल्लागार – संतोष कोचरेकर, कोषाध्यक्ष -शशिकांत डांगरे, जिल्हा उपाध्यक्ष – गोविंद जाधव, राजन राटुळ, संजयकुमार घाडीगावकर, सहसचिव जावेद शेख, विश्वनाथ चव्हाण, कार्यालयीन सचिव -किरण चेंडगे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख – आदिनाथ उस्तुरे.

जिल्हा मुख्य संघटक – संतोष परब, रामचंद्र डोईफोडे , तानाजी भोसले, राधिका जगदाळे.

जिल्हा प्रतिनिधी- 

वासुदेव वारंग, रामचंद्र सातवसे, जयश्री कोरगावकर, विनायक जंगले,प्रशांत निंबाळकर, नेहा गवाणकर, प्राजक्ता कनयाळकर, मनीषा नाटेकर,भाग्यश्री भोसले,योगिता नेहाले शामराव ताठे,कृष्णा भरणकर, किरण शिंदे, दिलीप उबाळे, माधवी सावंत, रवींद्र मोरे, प्रभाकर जाधव ,, योगिता परसुटकर, पूजा विभुते.

संघटनेचे राज्य संघटक किसन दुखंडे यांनी नूतन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. अधिवेशनात मांडण्यात आलेल्या २१ ठरावांची पूर्तता करण्यासाठी नूतन जिल्हा कार्यकारणी सज्ज असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी सांगितले.