सावंतवाडी प्रतिनिधी: ओवळीये जंगलात शिकारीसाठी गेलेल्या युवकाला सहका-याच्या बंदुकीची गोळी लागून तो ठार झाला आहे. ही घटना रात्री उशिरा घडली. सचिन मर्गज वय २८ रा. सांगेली ता सावंतवाडी असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयित म्हणून सुप्रियान डान्टस रा. कोलगाव वय ४५ याला ताब्यात घेण्यात आले आहे
याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांकडून देण्यात आली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर मर्गज याचा मृतदेह येथील कुटीर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असल्याचे समजते. त्यानुसार पोलीस तपास करत आहेत. यातील मृत सचिन आणि सुप्रियान हे दोघे आपल्या काही सहकाऱ्यांसमवेत ओळी जंगलात शिकारीसाठी गेले होते. यावेळी डुकराची शिकार करत असताना हा प्रकार घडला. यात मग त्याच्या छातीच्या उजव्या बाजूला गोळी लागली आहे. जखमी झाला त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्याचा मृत्यू झाला. याबाबत सावंतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.







