Home राजकारण शिंदे गट आमदार अपात्रतेसंदर्भात बातमी!

शिंदे गट आमदार अपात्रतेसंदर्भात बातमी!

179

२६ जुलै वार्ता: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गट शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रतेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील ४० आमदारांना दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या ४० आमदारांसह ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्रतेसंदर्भात नोटीस पाठवली होती. या नोटीसीवर दोन आठवड्यात उत्तर द्या, असे निर्देश नार्वेकर यांनी दिले होते. अध्यक्षांच्या नोटीसीला ठाकरे गटाच्या आमदारांनी वेळेवर उत्तर दिले. परंतु, विधीमंडळ कामकाज सुरु असल्याने शिंदे गटातील आमदारांनी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी नार्वेकर यांच्याकडे केली होती. त्यामुळे या आमदारांना नोटीसीला उत्तर देण्यासाठी नार्वेकर यांनी शिंदे गटातील आमदारांना दोन आठवड्याची मुदत दिली आहे. अलीकडेच नार्वेकर, सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची यासंदर्भात आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून आता आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी आणखी दोन आठवड्याची मुदत देण्यात आली आहे.