३ जून वार्ता: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांना श्रीकांत शिंदेंबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा संजय राऊत यांनी थू म्हणत थुंकण्याची कृती केली होती. संजय राऊत यांच्या या कृतीविरोधात आता शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिंदे गटाकडून संजय राऊत यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून संजय राऊत यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. संजय राऊत मुक्कामी असलेल्या पंचतारांकित हॉटेल बाहेर पोलिस तैणात करण्यात आले आहेत.
दरम्यान संजय राऊत यांच्या विरोधात सुरू असलेल्या शिंदे गटाच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना त्यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. ही जनता निवडणुकीत त्यांना जोडे मारल्याशिवाय राहणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊता याच्या विरोधात शिंदे गट आक्रमक झाल्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.