विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल येथे स्पर्धा संपन्न….
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजन….
सिंधुदुर्ग: शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आणि महाराष्ट्र चेस असोसिएशन यांच्या सहकार्याने व युवक कल्याण संघ संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ३ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल येथे आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, छ. संभाजी नगर, लातूर, अमरावती या विभागातून १४,१७, १९ वर्षाखालील मुले-मुली असे एकूण २४० स्पर्धक सहभागी झाले होते.शुक्रवारी या स्पर्धेचे बक्षिस वितरण पार पडले. बुद्धिबळ स्पर्धेत विजयी होऊन राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झालेल्या ३० स्पर्धकांना जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, युवक कल्याण संघाचे खजिनदार प्रा. मंदार सावंत,कॉलेजचे प्र. प्राचार्य चंद्रशेखर बाबर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले.
यावेळी तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, जिल्हा बुद्धीबळ असो. सचिव श्रीकृष्ण आडेलकर, उपमुख्य पंच आरती मोदी, चेस सरकलचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुयोग धामापूरकर, रोहित पोळ, पंढरीनाथ चव्हाण, प्रा.अमर कुलकर्णी, प्रा. संजय लोहार, प्रा. नेहा गुरव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. श्वेता शिरोडकर, प्रा.शामली राणे यांनी केले.
बुद्धिबळ स्पर्धेत विजयी झालेले व राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे…
१४ वर्षाखालील मुले -प्रथम अर्णव महेश कोळी (मुंबई), द्वितीय निशांत अभिजित जवळकर (सांगली), तृतीय मानस सुमुख गायकवाड (सोलापूर), चतुर्थ इलेश आशिष त्रिपाठी(मुंबई), पाचवा आर्यन बालाजी राव(पुणे).
१४ वर्षाखालील मुली-प्रथम श्रेया गुरप्पा हिप्परगी(सांगली),द्वितीय श्रद्धा सचिन बजाज (नागपूर), तृतीय व्रीतिका कृष्णा गमे (नागपूर),चतुर्थ चतुर्थी प्रदीप परदेशी (सोलापूर),पाचवी सारा सचिन हरोले (सांगली).
१७ वर्षाखालील मुले- प्रथम विरेश दयानंद शरणार्थी(पुणे), द्वितीय ललिता डिताय्यानर बुमीनायन( मुंबई)तृतीय श्लोक दयानंद शरणार्थी(पुणे),चतुर्थ क्षत्रिय नितीन वेखंडे( मुंबई), पाचवा अरविंद प्रकाश अय्यर (मुंबई).
१७ वर्षाखालील मुली- प्रथम सिन्नीधी रामकृष्ण भट(मुंबई), द्वितीय अनुष्का बापू कुतवळ(पुणे), तृतीय श्रुती श्रीराम काळे( छ. संभाजीनगर), चतुर्थ सानी नीरज देशपांडे ( छ. संभाजीनगर), पाचवी ईश्वरी अमित जगदाळे (सांगली).
१९ वर्षाखालील मुले-प्रथम दिशांक सचिन बजाज(नागपूर), द्वितीय योहाना केतन बोरीचा(मुंबई),तृतीय आशिष सोन्याबापू चौधरी,चतुर्थ वेदांत नितीन वेखंडे( मुंबई), पाचवा अंश प्रमोद धनविज(नागपूर).
१९ वर्षाखालील मुली- प्रथम तनिषा सागर बोरामणीकर( छ. संभाजीनगर),द्वितीय तन्वी शामराव बोराटे(मुंबई),तृतीय दिव्या शरद पाटील(सांगली), चतुर्थ दिशा शरद पाटील( सांगली), पाचवी क्रिती मयूर पटेल(मुंबई).