Home क्राईम शासकीय वनात गावठीबाँम्ब पेरणाऱ्या आरोपींची कारागृहात रवानगी, जामीन नाहीच..!

शासकीय वनात गावठीबाँम्ब पेरणाऱ्या आरोपींची कारागृहात रवानगी, जामीन नाहीच..!

232

 

सावंतवाडी: परवा रात्री घात लावून बसलेल्या वन विभागाच्या गस्ती पथकास आंबेगाव येथे असलेल्या वन सर्वे क्रमांक-81 मध्ये आज भल्या पहाटे तीन इसम, नामे -1)अबीर प्रकाश आंगचेकर रा. सांगेली (खालचीवाडी)-वय 30 वर्षे, 2)चंद्रकांत शंकर दळवी रा.आंबेगाव (म्हारकटेवाडी)-वय 50 वर्षे, 3)शांताराम गोपाळ राऊळ रा.सांगेली (टेंबकरवाडी)-वय 46 वर्षे गावठी बॉम्ब पेरताना आढळून आले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यापैकी आरोपी क्रमांक-1 हा फरार होण्याच्या उद्देशाने पळू लागला. त्याचा पाठलाग करून वनविभागाच्या गस्ती पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी बाळगलेले जिवंत गावठी बॉम्ब (नग-16) तसेच सोबत आणलेल्या दोन दुचाकी क्रमांक- 1)पल्सर MH 07 Z 8935 व हिरो डीलक्स MH 07 AF 1896 हे देखील जप्त करण्यात आले. आरोपींना अटक करून वन्यजीव संरक्षण अधिनियम-1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.काल आरोपींना सावंतवाडी न्यायालयाने आज पर्यंतची वन कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज सदरच्या आरोपींना कणकवली कोर्टात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावन्यात आली परंतु त्यांच्या जामीनाचा निर्णय सोमवारी राखून ठेवण्यात आला. या कारणाने सदर आरोपींची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात आली.

सदरच्या कोर्टकेस कारवाई मध्ये वन विभागाची बाजू तपास अधिकारी, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर(अतिरिक्त कार्यभार फिरते पथक) यांनी मांडली तर आरोपींच्या वतीने ऍडव्होकेट परिमल नाईक यांनी कामकाज पाहिले.