Home शिक्षण शासकीय तंत्रनिकेतन मालवणला स्मार्ट क्लासरूम इंट्रॅक्टीव्ह बोर्ड प्रदान

शासकीय तंत्रनिकेतन मालवणला स्मार्ट क्लासरूम इंट्रॅक्टीव्ह बोर्ड प्रदान

305

 

 

महापारेषण सी. एस. आर. फंडातून मिळाली मदत!

 

मसुरे प्रतिनिधी:

 

शासकीय तंत्रनिकेतन मालवण या संस्थेला महापारेषण यांच्या सीएसआर फंडातून स्मार्ट क्लासरूम इनट्रेक्टिव्ह बोर्ड प्रदान करण्यात आला. सदर क्लास रूमचे अनावरण महापारेषण अभियंता श्री भोगले यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे प्राचार्य, महापारेषण चे तंत्रज्ञ श्री बावलेकर, कॉलेज विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना या स्मार्ट क्लासरूमचा नक्कीच फायदा होईल असे महापारेषण कुडाळचे अभियंता श्री भोगले यांनी सांगितले.