Home Uncategorized शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या सूचनेनुसार सोनुर्ली जत्रोत्सव मंदिर परिसर झाला...

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या सूचनेनुसार सोनुर्ली जत्रोत्सव मंदिर परिसर झाला स्वच्छ….!

137

सावंतवाडी प्रतिनिधी: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सोनुर्ली जत्रोत्सव मंदिर परिसर ला भेट दिली. आणि तात्काळ या परिसरातील लोटांगणासाठी जो मार्ग असतो तो चिखलमय झाला होता. सदरच्या मार्गावर चिखलमय परिसर स्वच्छ सुंदर करून भाविकांना लोटांगणासाठी सुलभ व्हावे या दृष्टीने तात्काळ आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना करून सदर लोटांगणाचा परिसर भाग व मार्ग सुरळीत करून चिखलमय झाला होता. त्यातून सुटका केली आहे. शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते परशुराम चलवाडी यांनी दिपक केसरकर यांच्या सूचनेनुसार हा परिसर स्वच्छ केला आहे. लोटांगणाच्या परिसर भागात चिखल झाला होता, तिथे वाळू व मातीचा थर टाकून तो भाग स्वच्छ करण्यात आला आहे. त्यामुळे भक्तांना आता सुलभ आणि चांगल्या पद्धतीत सोनुर्ली जत्रोत्सवाचा आनंद घेता येणार आहे. असे शिवसेनेचे तथा माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी स्पष्ट केले.