Home स्टोरी शालेय बाल कला – क्रीडा व ‘ज्ञानी मी होणार.!’ या महोत्सवांतर्गत सावंतवाडी...

शालेय बाल कला – क्रीडा व ‘ज्ञानी मी होणार.!’ या महोत्सवांतर्गत सावंतवाडी केंद्रस्तरीय स्पर्धा जिमखाना मैदान येथे संपन्न….!

42

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या शालेय बाल कला – क्रीडा व ‘ज्ञानी मी होणार.!’ या महोत्सवांतर्गत सावंतवाडी केंद्रस्तरीय स्पर्धा जिमखाना मैदान येथे संपन्न झाल्या. या विविध स्पर्धेत सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेचे नाव उज्वल केले.

१४ वर्षाखालील मुलांच्या गटात – ५०  मीटर धावणे निलेश जनार्दन पाटील – तृतीय क्रमांक, १०० मीटर धावणे आरुष रवींद्र नाईक तृतीय क्रमांक, लांब उडी व उंच उडी मध्ये तन्मय अमित कांबळे याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तर ओम दिलीप कोचरेकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

 

५०  × ४ रिले या सांघिक प्रकारात द्वितीय क्रमांक, खो – खो मध्ये प्रथम क्रमांक, कबड्डीमध्ये द्वितीय क्रमांक, समुहगीत प्रथम क्रमांक, समुह नृत्य प्रथम क्रमांक, ज्ञानी मी होणार द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

तसेच १४  वर्षाखालील मुलींच्या गटात ५० मीटर धावणे स्वरा सुरज कर्पे – प्रथम क्रमांक, संस्कृती शैलेश सरमळकर – द्वितीय क्रमांक, १०० मीटर धावणे स्वरा संतोष माणगावकर – द्वितीय क्रमांक, उंच उडीमध्ये श्रुती संदीप सावंत प्रथम क्रमांक व रिया सिताराम तोडणकर – तृतीय क्रमांक, लांब उडी – संस्कृती शैलेश सरमळकर प्रथम तर तनिषा आप्पाजी देसाई द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

 

सांघिक क्रीडा प्रकारात ५०× ४ रिले – प्रथम क्रमांक, खो – खो मध्ये (मुले व मुली) – प्रथम क्रमांक मिळवला.

यावर्षी झालेल्या या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळवल्याबद्दल शाळेला उपविजेतेपद केंद्रप्रमुख श्री. कमलाकर ठाकुर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. तसेच विविध स्पर्धांमध्ये मुलांनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पई, उपाध्यक्ष मोहन वाडकर, सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर व सर्व पदाधिकारी , शाळेचे सर्व पालक यांनी यशस्वी मुलांचे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप सावंत, सर्व शिक्षक -शिक्षिका यांचे अभिनंदन केले. या सर्व यश प्राप्त विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक धोंडी वरक, अमित कांबळे, श्रीम. ज्योत्स्ना गुंजाळ,  श्रीम. प्राची बिले, श्रीम. संजना आडेलकर, स्वरा राऊळ, श्रीम. घाडीगावकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.