Home स्टोरी शहरात सुव्यवस्था बिघडल्यास पोलीस प्रशासन जबाबदारी घेणार का? रवी जाधव 

शहरात सुव्यवस्था बिघडल्यास पोलीस प्रशासन जबाबदारी घेणार का? रवी जाधव 

196

सावंतवाडी प्रतिनिधी: एक वर्षाची तडीपाराची शिक्षा झालेला माजी नगरसेवक नासिर शेख हा आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कोर्टाकडून स्टे घेऊन पुन्हा सावंतवाडी मध्ये आला होता. परंतु शहरातील जनतेकडून त्याला तीव्र विरोध झाल्या कारणाने त्याने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला व आपला डमी दिला आहे. त्या पक्षाचा प्रचार तो खुलेआम पणे करत आहे. एक तर त्याच्या गुंड प्रवृत्तीमुळे शहरातील लोक त्याच्या पूर्णपणे विरोधात आहे. अशावेळी शहरात त्याच्यकडू काही दुर्घटना घडून शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडल्यास त्याचा प्रशासन व नागरिकांना त्रास होऊ शकतो यासाठी पोलीस प्रशासनाने नासिर शेख याचा ताबडतोब बंदोबस्त करावा. अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी केली आहे.