Home स्टोरी शहरातील बाजाराचा बाजार मांडण्यापेक्षा नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष द्या

शहरातील बाजाराचा बाजार मांडण्यापेक्षा नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष द्या

84

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा उप रुग्णालय जणू पांढरा हत्ती झाला आहे. येथे गेले कित्तेक दिवस फिजिशियन डॉक्टर नाही. शव पेटी बंद अवस्थेत आहे. रुग्णालयात औषधे उपलब्द नाहीत, ती प्रत्येक वेळी बाहेरून आणावी लागतात. याचे सोयर सुतक लोकप्रतिनिधींना नाही कि त्यामध्ये काही मलिदा मिळत नाही? तालुक्यातील ग्रामीण भागातील लोक मोट्या आशेने सावंतवाडी रुग्णालयात येतात. परंतु येथे त्यांची निराशा होते. लोकप्रतिनिधी फक्त आश्वासने देतात. मागील पाच वर्षे मल्टीप्लेक्स हॉस्पिटलचे स्वप्न दाखवले जात आहे, कि शुभारंभ कुणाच्या हस्ते होईल? पाटी कुणाच्या नावाची लागेल हा मुद्दा आहे? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

या सर्व गंभीर समस्या सावंतवाडी शहरात असताना सावंतवाडीतील काही राजकीय पुढारी मात्र सावंतवाडीच्या आठवडा बाजाराचं घोडं घेऊन बसले आहेत. सावंतवाडीच्या आठवडा बाजारावरून एकमेकांमध्ये रंगत तालीम रंगली आहे. आठवडा बाजारावरून एकमेकांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. खरंच आठवडा बाजार महत्त्वाचा आहे की त्यापेक्षाही वर दिलेल्या सर्व समस्या महत्त्वाच्या आहेत आणि या समस्यांकडे पुढार्यांनी लक्ष दिलं पाहिजे की नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.

नरेंद्र डोंगर सावंतवाडी

सावंतवाडी शहरातील मोकाट कुत्रे ही नागरिकांसमोरील गंभीर समस्या
सावंतवाडी मोती तलाव

सावंतवाडी शहराचं दुसरं नाव सुंदरवाडी असं आहे. सावंतवाडीतील मोती तलाव, सावंतवाडीतील वेगळी पर्यटन स्थळे, सावंतवाडी शहराची शोभा वाढवणारा नरेंद्र डोंगर याबाबत आज अनेक समस्या आहेत. पण सध्या तरी याकडे सहसा कुणाचा फारसा लक्ष दिसत नाही. आज सावंतवाडीतील मोती तलावाची तर दुरावस्थाच आहे. सावंतवाडी शहराची शोभा वाढवणारा नरेंद्र डोंगर या ठिकाणी काही लोकांकडून सर्व नियमांचे उल्लंघन होत आहे. नरेंद्र डोंगरामध्ये सहज फिरायला गेलं तर दारूच्या रिकाम्या बाटल्या, गुटखाची रिकामी पाकिटं, सिगारेटची रिकामी पाकिटं आणि वापर करून टाकलेले निरोध दिसतात. याचा अर्थ सावंतवाडी नरेंद्र डोंगरावर सर्व प्रकारचे गैरप्रकार चालतात. पण याबाबत आज कोणी पुढारी आवाज उठवत नाही. याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्याचप्रमाणे सावंतवाडी शहरांमध्ये भटक्या मोकाट कुत्र्यांचा आणि मोकाट गुरांचा मोठा प्रश्न आहे. मोकाट कुत्र्यांपासून मोकाट जनावरांपासून अनेक नागरिकांना यात्रा सहन करावा लागत आहे कित्येक वेळा अपघातही घडलेले आहेत. वेळोवेळी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन सुद्धा याबाबत अजून कोणताही ठोस पर्याय काढलेला नाही.

सावंतवाडी बस स्टॅन्ड

सावंतवाडी बस स्टॅन्डची तर अतिदुरावस्था आहे. मुताऱ्या अस्वच्छ आहेत. त्या ठिकाणी प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारच्या चांगल्या सुविधा उपलब्ध नाहीत. सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. सावंतवाडी शहराबाबत अशा अनेक समस्या असताना शहरातील आठवडा बाजार हाच मोठा मुद्दा आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर आहे.