Home राजकारण शरद पवार यांचीं घोषणा! निवडणूक लढवणार नाही, पक्षाचे अध्यक्षपदही सोडणार

शरद पवार यांचीं घोषणा! निवडणूक लढवणार नाही, पक्षाचे अध्यक्षपदही सोडणार

88

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: गेली सहा दशके राजकीय जीवनात आहे, अनेक पदे मला मिळाली. सध्या मी राज्यसभेवर आहे. याची तीन वर्षे बाकी आहे. ही तीन वर्ष संपल्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही आणि कोणतीही जबाबदारी घेणार नाही, अशी घोषणा शरद पवार यांनी आज केली आहे.  ते आज शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते.यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद देखील सोडणार असल्याची घोषणा केली. पक्षातील पुढील निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची देखील त्यांनी घोषणा केली. त्यावेळी त्यांनी पक्षाची नवी समितीही स्थापन केली. या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटिल, राजेश टोपे, जयदेव गायकवाड, छगन भुजबळ, धनंजय मुंडे या समितीने नवा नेता निवड करावी, अशी माहिती त्यांनी दिली.इतके वर्षे राजकीय जीवनात काम केलं आहे, मी आतापर्यंत ५६ वर्षे पदावर होतो. अजून तीन वर्षे माझी राज्यसभेची बाकी आहेत. कुठं थांबायचं हे मला माहिती आहे. त्यासाठी मी जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची लवकरच बैठक बोलवणार असल्याचंही ते म्हणाले.राजकारणातून निवृत्ती पण…यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की माझी निवृत्ती सार्वजनिक जीवनातून नाही. या आधीही मी संशोधन, कृषी, शिक्षण क्षेत्रात काम करत होतो. यापुढे देखील मी त्या क्षेत्रात काम करत राहील अशी घोषणा त्यांनी केली.