Home राजकारण शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात २ तास चर्चा!

शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात २ तास चर्चा!

128

अदानी समूहाचे मालक गौतम अदानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वरळी येथे शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी भेट झाली. दोघांमध्ये २ तास चर्चा झाली. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याविषयी अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी ‘हिंडेनबर्ग’ या आस्थापनाच्या अहवालाचा संदर्भ घेऊन गौतम अदानी यांनी शेअर बाजारामध्ये हेराफेरी करून स्वत:च्या समभागांच्या किमती वाढवल्याचा आरोप केला. केंद्र सरकार गौतम अदानी यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. या वेळी शरद पवार यांनी ‘हिंडेनबर्ग’ या आस्थापनाचे नाव यापूर्वी कधी ऐकले नाही’, असे म्हणत या आस्थापनाच्या अहवालाच्या विश्‍वासार्हतेविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केला होता. शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांच्या आरोपातील हवा निघून गेली. या पार्श्‍वभूमीवर शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.