Home स्टोरी शब्दसखा ग्रुप न्हावेली – निरवडेच्या वतीने वाचनालय “ऋणानुबंध” या कार्यक्रमाचे आयोजन

शब्दसखा ग्रुप न्हावेली – निरवडेच्या वतीने वाचनालय “ऋणानुबंध” या कार्यक्रमाचे आयोजन

73

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: शब्दसखा ग्रुप न्हावेली – निरवडेच्या वतीने वाचनालय वर्धापनदिना निमित्त विशेष कार्यक्रम ऋणानुबंध या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ऋणानुबंध भेट एका लेखिकेची हा कार्यक्रम श्री. मोर्ये सर निवास, न्हावेली येथे शुक्रवार दि. ५ मे २०२३ वेळ सायं ३ ते ६ या वेळेत संपन्न होणार आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक व मान्यवर यांचा लेखिकेच्या सहवासातला एक माहेरवाशिण क्षण असा उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सर्वांनी सहकुटुंब, मित्रपरिरासाह उपस्थित रहवे असे आवाहन शब्दसखा ग्रुप न्हावेली- निरवडे सर्व सभासदांनी केले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे

३.०० ते ३.१० : स्वागत (पंचारत ओवाळून) मळगांव हायस्कूल /पेंडूर शाळेची मुले

३.१० ते ३.२० : प्रार्थना- सोनुर्ली हायस्कूलची मुले

३.२० ते ३.३० : मान्यवरांचे भेटवस्तू देऊन स्वागत ( सोनूर्ली शाळा नं – ०१ ची मुले व इतर शाळेतील मुलांच्या हस्ते ) कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आजगांवकर गुरुजी

३.३० ते ३.३५ :३.३५ से ४.२० : “बालबगीचा” (कथाकथन कार्यक्रम) वैशालीताई पंडित (मालवण)

४.२० ते ४.३० : पुस्तक लोकार्पण सोहळा (मंत्रभूल)

४.३० ते ४.५० : प्रकट मुलाखत वैशालीताई पंडित यांची मुलाखतकार: प्राध्यापक श्री. रुपेश पाटील

४.५० ते ५.१० : प्रमुख पाहुण्यांची मनोगते.

५.१० ते ५.२० : वैशालीताई पंडित यांचे कार्यक्रमाविषयी मनोगत

५.२० ते ५.३० : आभार व समारोप सौ. स्मिता नाईक

५.३० ते ६.०० : चहापान.

संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन- श्री. प्रदीप सावंत (सोनुर्ली हायस्कूल)