Home स्टोरी शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटवण्याचा निर्णय स्वागतार्ह.

शनिशिंगणापूर मंदिरातील ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना हटवण्याचा निर्णय स्वागतार्ह.

127

शनिशिंगणापूर: श्री शनिशिंगणापूर मंदिरात मुसलमान कर्मचाऱ्यांकडून पवित्र चौथऱ्यावर ग्रील बसवण्याच्या प्रकारामुळे हिंदू समाजात तीव्र संताप होता. यानंतर मंदिर प्रशासनाने ११४ मुसलमान कर्मचाऱ्यांना कामावरून हटवले, ही योग्य आणि वेळेवर उचललेली कृती आहे. हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांतर्फे या निर्णयाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

 

या घटनेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियंत्रणात असलेल्या अन्य देवस्थानांमध्येही अशा अन्य धर्मीय कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ सेवामुक्त करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

“मंदिर हे श्रद्धेचे केंद्र असून तेथे कर्मचाऱ्यांची श्रद्धा व आचार धर्मसंगत असणे आवश्यक आहे. मंदिर व्यवस्थापनाने सात्त्विकतेचा विचार करूनच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी,” असे मत हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केले आहे.