Home स्टोरी व्‍हिसा संपूनही पुणे येथे अवैधपणे रहाणार्‍या परदेशी नागरिकांची विशेष शाखेकडून शोधमोहीम चालू...

व्‍हिसा संपूनही पुणे येथे अवैधपणे रहाणार्‍या परदेशी नागरिकांची विशेष शाखेकडून शोधमोहीम चालू !

113

पुणे: शहरात परदेशी नागरिक शिक्षण आणि व्‍यवसाय यानिमित्त वास्‍तव्‍य करतात. यासाठी ‘स्‍टुडंट व्‍हिसा’ किंवा ‘बिझनेस व्‍हिसा’ घ्‍यावा लागतो. या ‘व्‍हिसा’ची मुदत संपल्‍यावर काही जण मुदत वाढवून काही दिवस वास्‍तव्‍य करतात. अशा नागरिकांवर न्‍यायालयीन कारवाई करून त्‍यांना पुन्‍हा मायदेशी पाठवण्‍यासाठी पुणे शहरात पोलिसांनी अशा नागरिकांची सूची सिद्ध केली आहे. त्‍यानुसार अनुमाने ३२५ नागरिक पुणे शहरात अवैधरित्‍या वास्‍तव्‍य करत असल्‍याचे, तसेच ते दिलेल्‍या पत्त्यावर रहात नसल्‍याचे उघड झाले आहे. यामुळे त्‍यांचा शोध घेणे अवघड झाले आहे.

 

विशेष शाखेचे पोलीस उपायुक्‍त आर्. राजा यांनी सांगितले की,

 

१. पोलिसांनी केलेल्‍या सूचीत वर्ष २०१६ पासून देशात अवैधरित्‍या मुक्‍काम केलेल्‍या परदेशी नागरिकांचा समावेश आहे. हे परदेशी नागरिक येमेन, उझबेकिस्‍तान, इराण, कझाकस्‍तान, युगांडा आणि नायजेरिया येथून भारतात आले आहेत. यापैकी अनुमाने ९० टक्‍के परदेशी नागरिक पुणे येथील विविध महाविद्यालये आणि विद्यापीठ यांमध्‍ये उच्‍च शिक्षण घेण्‍यासाठी तर इतर पर्यटक, वैद्यकीय अन् व्‍यावसायिक ‘व्‍हिसा’वर भारतात आले आहेत.

 

२. व्‍हिसाची मुदत वाढवून मिळणार नाही, हे लक्षात येताच काही परदेशी नागरिक दिलेला पत्ता पालटून अवैध वास्‍तव्‍य करतात. अनेकदा ते त्‍यांच्‍या देशातील येथे कायदेशीर रहाणार्‍या नागरिकांच्‍या निवासस्‍थानी वास्‍तव्‍य करतात, तसेच आपला अभ्‍यासक्रम कधीच वेळेत पूर्ण करत नाहीत.