Home क्राईम वॉन्टेड लश्कर-ए-तेयबाचा कमांडर ख्वाजा शाहिद ठार….

वॉन्टेड लश्कर-ए-तेयबाचा कमांडर ख्वाजा शाहिद ठार….

199

७ नोव्हेंबर वार्ता: भारताला हव्या असणाऱ्या आणि पाकिस्तानमध्ये आश्रय घेत असलेल्या अनेक आतंकवाद्यांच्या गेल्या काही महिन्यांत हत्या झाल्या आहेत. त्यामध्ये आता  मुजाहिदची भर पडली आहे. २०१८ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील सुंजुवान भागातील भारतीय लष्कराच्या तळावर केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लश्कर-ए-तेयबाचा कमांडर ख्वाजा शाहिद उर्फ मिया मुजाहित याचा शिरच्छेद केलेला मृतदेहपाकव्याप्त काश्मीरमधील नियंत्रण रेषेनजीक आढळला आहे.

१० फेब्रुवारी, २०१८ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील लष्कराच्या तळावर सशस्त्र दहशतवाद्यांनी जोरदार हल्ला केला होता. एके ५६ रायफल, ग्रेनेड लाँचर्स आणि मोठ्या प्रमाणावर दारुगोळा घेऊन हल्ला केलेल्या दहशतवाद्यांपैकी सुरक्षा दलाने तिघांचा खात्मा केला होता. या हल्ल्यात सहा महिला आणि लहान मुलांसह १० जण जखमी झाले होते. जखमींपैकी एक महिला गर्भवती होती. त्यानंतर तिने एका गोंडस मुली जन्म दिला.