Home स्टोरी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ‘हिंदु राष्ट्र: आक्षेप-खंडण’ या ‘ई-बुक’चे प्रकाशन!

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ‘हिंदु राष्ट्र: आक्षेप-खंडण’ या ‘ई-बुक’चे प्रकाशन!

133

भारतात आता ‘रेल जिहाद’? आर.एस्.एन्. सिंह, संरक्षण विशेषतज्ञ.….

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात हिंदू नागरिक मोठ्या संख्येने सहभागी

२१ जून वार्ता: ‘काही दिवसांपूर्वी बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघात होऊन त्यात जवळपास ३०० प्रवाशांचा मृत्यू झाला. बालासोरच्या आधी ३१ मार्चला दिल्लीतील शाहीन बाग येथील शाहरूख सैफी या जिहाद्याने केरळमध्ये जाऊन ‘अलप्पुळा-कन्नूर एक्सप्रेस’मध्ये पेट्रोलसारखा घातक ज्वलनशील पदार्थ टाकून ३ प्रवाशांना जाळून ठार मारले, तर त्या घटनेत ९ जण गंभीर जखमी झाले. शाहरूख सैफी हा भारतात बंदी घातलेल्या झाकीर नाईकचा अनुयायी आहे. त्यानंतर १ जून रोजी त्याच रेल्वेत पुन्हा तशाच घटनेची पुनरावृत्ती झाली. केरळमधील कन्नूर स्थानकात बोगीला आग लावण्यात आली. ती बोगी भारत पेट्रोलियमच्या इंधन टाक्यांजवळ होती. याला म्हणतात ‘गजवा-ए-हिंद’, हाच ‘रेल जिहाद’ आहे.

जेव्हापासून भारतात ‘वंदे भारत एक्सप्रेस’ चालू झाली, तेव्हापासून तिच्यावर देशभरात ठिकठिकाणी दगडफेक होत आहे. हल्ल्याची पद्धतही एकसमान आहे. ‘वंदे भारत’विषयी इतका तिरस्कार का? ‘वंदे मातरम्’चा द्वेष करणारेच ‘वंदे भारत एक्स्प्रेस’वर हल्ले करत आहेत, हा ‘रेल जिहाद’ नव्हे का? असा प्रश्न दिल्ली येथील संरक्षण विशेषतज्ञ कर्नल आर.एस्.एन्. सिंह यांनी उपस्थित केला. ते ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ‘रेल जिहाद’ या विषयावर बोलतांना केले.

या प्रसंगी छत्तीसगड येथील पू. श्री रामबालकदासजी महात्यागी महाराज यांच्या शुभहस्ते मराठी आणि हिंदी भाषेतील ‘हिंदु राष्ट्र: आक्षेप-खंडण’ या ‘ई-बुक’चे प्रकाशन करण्यात आले.

त्रिपुरात शाळांच्या माध्यमातून हिंदूंचे धर्मांतर! – पू. चित्तरंजन स्वामी महाराज, त्रिपुरा

वर्ष १९८५- ८६ पासून त्रिपुरामध्ये हिंदूंचे धर्मांतर मोठ्या प्रमाणात होत आहे. ख्रिस्त्यांनी मुलांसाठी इंग्रजी शिक्षण देणार्‍या शाळा काढल्या आहेत. या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांना चांगल्या शिक्षणाचे आमिष दाखवून आणि बुद्धिभेद करून विद्यार्थी अन् पालक यांचे धर्मांतर केले जात आहे. त्रिपुरात मठ-मंदिरांमध्ये अनेक साधू-संत आहेत; परंतु तेथे येणार्‍या हिंदूंना धर्माचे शिक्षण दिले जात नसल्याने धर्मांतराची समस्या फोफावली आहे. हिंदु धर्म वाचला, तर मठ-मंदिरे टिकणार आहेत. देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी प्रतिज्ञा करावी की, आम्ही धर्मांतर रोखून सनातन धर्माचे, हिंदूंचे रक्षण करू आणि प्रसंगी धर्मासाठी प्राणत्यागही करू, असे आवाहन त्रिपुरा येथील ‘शांती काली आश्रमा’चे पू. चित्तरंजन स्वामी महाराज यांनी केले. ते ‘त्रिपुरा येथील धर्मांतराची समस्या, उपाय आणि यश’ या विषयावर बोलत होते.

या प्रसंगी छत्तीसगड येथील ‘श्री जामडी पाटेश्वरधाम सेवा संस्थान’चे संचालक पू. श्री रामबालकदासजी महात्यागी महाराज म्हणाले, ‘‘केवळ व्यासपिठावरून घोषणा करून हिंदु राष्ट्राची स्थापना होणार नाही. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्यक्ष कार्य करण्याची आवश्यकता आहे.’’ तर नेपाळ येथील ‘ॐ रक्षा वाहिनी’चे प्रमुख श्री. चिरण वीर प्रताप खड्का म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्र असलेल्या नेपाळला मागील एक दशकापासून धर्मनिरपेक्ष घोषित करून समस्त हिंदूंच्या आस्थेवर प्रहार करण्यात आला आहे. तरी नेपाळसह संपूर्ण विश्वाला हिंदु राष्ट्र करण्याचे ध्येय हिंदूंनी बाळगायला हवे.

’आपला विश्वासू, श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती (संपर्क : 99879 66666)