Home स्टोरी वैकुंठरथ आणणे गोवा बनावटी दारू विक्री इतके सोप काम नाही..! लक्ष्मण कदम

वैकुंठरथ आणणे गोवा बनावटी दारू विक्री इतके सोप काम नाही..! लक्ष्मण कदम

151

सावंतवाडी प्रतिनिधी:  रवी जाधव हे हाडाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. तसेच ते मोठ्या परिश्रमाने उच्च शिक्षण घेऊन बीए बीएड, एम ए, एम फिल फर्स्ट क्लास मध्ये पास झाले आहेत. त्यांची शैक्षणिक व सामाजिक पात्रता सावंतवाडीच्या जनतेला माहित आहे. ज्या परिस्थितीतून ते आले त्या परिस्थितीची त्यांना जाणीव आहे त्या मुळे ते संकटात असलेल्या लोकांना रात्रंदिवस मदत करत आहेत या गोष्टीचा पहिला अभ्यास करा नंतरच त्यांच्यावर बोला. रवी जाधव यांनी फक्त मानवी जीवनाशी निगडित असलेल्या विषयावर आवाज उठवला आपण यावर काहीच न बोलता भंकस बाता करत आहात.

आपलं शहर व आजूबाजूच्या गावासाठी तुमचं सामाजिक योगदान काय आहे हे सर्वप्रथम दाखवा आणि मगच बोला अजून तुम्ही खूप लहान आहात उगाच आमच्या सामाजिक कामात ढवळाढवळ करू नका. कोरोनाच्या महामारी मध्ये तुमच्या नेत्यांनी रवी जाधव यांचा व्यवसाय उध्वस्त करून त्याला व त्याच्या कुटुंबाला ७ दिवस रस्त्यावर आणून किती त्रास दिला होता?  हे पण सावंतवाडीच्या जनतेने पाहिलं आहे. जनतेच्या आशीर्वादानेच रवी जाधव सावरू शकले आणि आज ते पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभा राहिला. अजूनही रस्त्यावर बसून सणासुदीच्या वस्तू विक्री करून त्या कष्टाच्या मिळालेल्या पैशातून प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करत आहेत. त्यांच्या कामाची पद्धत आम्ही जवळून पाहिली आहे म्हणूनच आम्ही त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून प्रसंगी रात्रंदिवस जनसेवा करत आहोत फक्त चार दिवस तुम्ही आमच्या सोबत काम करून दाखवा म्हणजे कळेल समाजसेवा काय असते ती उगाच कुणाची सुपारी घेऊन रवी जाधव यांच्या कार्यावर बोट ठेवू त्यांच्या सामाजिक कार्याचा अपमान करू नका तुम्ही कोणाबद्दल बोलतात याचं जरा भान ठेवा अन्यथा तुमचे काय धंदे आहेत ते जनतेसमोर आणू आणि तुम्ही त्यांच्याकडे जो हिशोब मागत आहात त्या अगोदर त्यांचा मागचा हिशोब तुम्ही स्वतः देणे लागतात तो हिशोब अगोदर क्लिअर करा मगच त्यांच्या हिशोबावर बोला.

स्थानिक नेते माननीय दिपकभाई केसरकर यांचे आम्ही तुमच्या अगोदर पासूनच शुभचिंतक आहोत त्यांच्या प्रत्येक चांगल्या कामाची आम्ही नेहमी स्तुती करतो परंतु जेथे चुकीचं वाटतं तेथे आम्हाला आवाज उठवावाच लागणार कारण हा आमच्या सर्वसामान्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि तो अधिकार आम्हाला संविधानाने दिला आहे. राहिला विषय सहा दिवसाच्या मिनी महोत्सवाचा स्टेज, बैठक व्यवस्था, लाईट व साऊंड याचा खर्च

मा. दिपक भाई केसरकर यांनी केला होता तर सहा दिवसा करिता स्टॉल बांधनी खर्च, चार दिवसाच्या कार्यक्रम खर्च, डिजिटल स्क्रीन भाडे,तसेच प्रत्येक दिवसाचे रोख रक्कम बक्षीस वितरणासाठी लागणारा सर्व खर्च पदरी मोड करून आम्ही स्वतः केला. तसेच मा.दीपक भाई केसरकर मित्र मंडळाच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मोठ्या थाटा माटात सहा दिवस मिनी महोत्सव साजरा करून शहरातील जनतेला व स्टॉल धारकांना आनंद दिला होता त्यावेळी मा.दीपक भाई केसरकर यांनी देखील आमचे कौतुक केले होते. दीपक भाई केसरकर यांनी आम्हाला केलेली मदत ही जनतेसाठीच होती त्याचा आताच्या युवा नेत्यांनी वर्म काढू नये त्यावेळी आपण या सिस्टीम मध्ये नव्हतात.

अजून काही माहिती पाहिजे असेल तर वैयक्तिक मा.दीपक भाई केसरकर व मित्र मंडळ यांना विचारू शकतात. राहिला विषय वैकुंठ रथाचा, वैकुंठ रथच काय तर ॲम्बुलन्स पण आम्ही लवकर आणणार आणि ती ही आमच्या गोरगरिब रुग्णांसाठी 24 तास मोफत असणार हा रवी जाधव यांचा संकल्प आहे. आम्ही स्व कष्टाने व स्व हिमतीने सामाजिक कार्य करतो आणि याही पुढे करत राहणार.

आम्हा सर्वसामान्य जनतेला होत असलेल्या त्रासावर आम्ही बोट ठेवतो तुमच्या कुठच्याही नेत्यांची विनाकारण बदनामी करण्याची आम्हाला मुळीच इच्छा नाही तुम्हाला दुखत असेल तर त्याच्यावर आमच्याकडे मुळीच इलाज नाही. याही पुढे या शहरात चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्याच्यावर आम्ही बोट ठेवणारच तुम्ही वाटेल तेवढं तोंड उघडा आरोप करा आम्ही तुमच्या तोंडात मावणारे नाही. रवी जाधव यांचा व्यवसाय व सामाजिक काम हे एक नंबरच पारदर्शक आणि जनहिताचे आहे याची रोज पोच पावती त्याला जनतेकडून मिळते याचा त्यांना समाधान व आनंद आहे.

याही पुढे आमच्या न्याया हक्कासाठी आम्ही लढतच राहणार. कारण शिव छत्रपती शिवाजी महाराज व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आम्हाला लाभलेला आहे. येथे जाती धर्मावरून पात्रता ठरवू नका त्यांच काम पहा.