Home स्टोरी वेर्ले सटवाडी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ.

वेर्ले सटवाडी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ.

50

सावंतवाडी प्रतिनिधी: गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेर्ले सटवाडी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे आंबोली मंडल अध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांच्याहस्ते करण्यात आला. रस्त्याचा हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे सटवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी रवींद्र मडगावकर यांनी वेर्ले गावाच्या विकासासाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, तसेच भाजपा व जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे आंबोली मंडल उपाध्यक्ष सुभाष राऊळ, वेर्ले सरपंच रुचिता राऊळ, माजी सरपंच बाबा राऊळ, ग्रामपंचायत सदस्य स्नेहा राऊळ, भगवान राणे, विलास राऊळ, यशवंत राऊळ, गंगाराम राऊळ, गोविंद राऊळ, तुकाराम बिडये, चंद्रकांत राऊळ, अनंत राऊळ, न्हानू राणे, रामा राणे, गोपाळ राणे, महादेव राणे, नारायण ठाकूर, शांताराम सावंत, भिवा कदम आदी सटवाडीतील सर्व महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.