सिंधुदुर्ग: आज रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे मालवण तालुक्यातील वेताळगडावरील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आली. वेताळगडावर गडाच्या उत्तरेस काताळात तीन टाक्या आहेत. या टाक्या झाडाझूडूपांनी आच्छादलेल्या होत्या. दुर्ग मावळा प्रतिष्ठानने आज स्वच्छता मोहीम आखून या टाक्या स्वच्छ केल्या.
या मोहिमेला दुर्ग मावळा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग प्रसिद्धी प्रमुख रोहन राऊळ, मालवण तालुकाध्यक्ष प्रसाद पेंडूरकर, कुडाळ तालुकाध्यक्ष योगेश येरम, जालिंदर कदम, वेताळगड संवर्धन प्रमुख अनिकेत गावडे, नेहा गावडे, कविश गावडे, सानवी गावडे, दुर्गेश गावडे, यतिन सावंत, लक्ष्मण फोपळे आदी मावळे उपस्थित होते.