Home स्पोर्ट वेटलिफ्टिंग स्पर्धेत पेंडूर हायस्कूलचे यश!

वेटलिफ्टिंग स्पर्धेत पेंडूर हायस्कूलचे यश!

104

मसुरे प्रतिनिधी: क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पेंडुर हायस्कुलने यश प्राप्त केले आहे. 65 किलो वजनाखालील गटामध्ये कुमार गुरुदास विलास गाडी (प्रथम क्रमांक) व ७१ किलो खालील वजनी गटामध्ये कुमार साईश संतोष हिंदळेकर (प्रथम क्रमांक) पटकावला. या दोन्हीही विद्यार्थ्यांची विभाग स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षिका देसाई मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.manavgat escort

प्रशालेचे मुख्याध्यापक श्री .तावडे सर, संस्थेचे अध्यक्ष श्री .बाबाराव राणे, सचिव श्री. घन:श्याम राणे, सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.