Home स्टोरी वेंगुर्ले तुळसमध्ये आढळला अतिदुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल साप

वेंगुर्ले तुळसमध्ये आढळला अतिदुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल साप

214


वेंगुर्ले :- तुळस येथील सर्पमित्र महेश राऊळ यांना अति दुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल स्नेक २०२१ मध्ये आढळला होता.दोन वर्षांनी पुन्हा एकदा अति दुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल स्नेक (साप) आढळून आला आहे. दि.13 ऑगस्‍ट संध्याकाळी तुळस चूडजीवाडा येथील सद्गुरु सावंत यांनी सर्पमित्र महेश राऊळ यांना फोन करून एक छोटासा साप असल्याची माहिती दिली.राऊळ यांनी सापाला सुरक्षितरित्या रेस्क्यू केले. याआधीही बरेचसे अति दुर्मिळ असे पशु, पक्षी, प्राणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलेले आहेत. हल्लीच तुळस गावाच्या बाजूला होडावडे गावात रात्री चमकणारी अळंबी आढळून आली होती. याआधी काळा वाघ असेल, रांगणा गडावर आढळलेला शेवाळी साप किंवा इतर दुर्मिळ पक्षी सिंधुदुर्गातच आढळल्याची नोंद आहे. या रेस्क्यूच्या वेळी त्यांच्यासोबत वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा. सचिन परुळकर, गुरुदास तिरोडकर आणि सद्गुरु सावंत आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर सर्पमित्र महेश राऊळ यांनी त्या सापाला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.