सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सरकारी कार्यालयातील महत्त्वाची जमिनीची कागदपत्रे चोरीला वेंगुर्ले जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या बाजुला असलेल्या वेंगुर्ला तलाठी कार्यालयाच्या जुन्या स्टोरेज काॅटर्स मधून जमिनीचे फेरफार असलेली महत्त्वपूर्ण सरकारी कागदपत्रे चोरीला गेल्याने एकच खळबळ उडालीचोरीस गेलेली कार्यालयीन महत्त्वपूर्ण सरकारी कागदपत्रे :- सन १९५६ पासून ते सन २०१६ पर्यंतच्या मेळाच्या फाईल्स कागदपत्रे फेरफार क्रमांक १३०००ते फेरफार क्रमांक १६००० जु.वा.किं.सू. २} ००,०० रू.सन १९५६ पासून ते २०१६ पर्यंतचे आकारबंद रजिस्टर जु.वा.किं.सू.३} ००,०० रू.सन १९५६ पासून ते सन २०१६ पर्यंतचे दुरुस्त आकारफोड पत्रक कागदपत्रे जु.वा.किं.सू.४} ००,०० रू.सन १९५६ पासून ते सन २०१६ पर्यंतचे वेंगुर्ला शहरातील नकाशे जु.वा.किं.सू.५} ००,०० रू.सन १९५६ पासून ते सन २०१६ पर्यंतचे गाव नमुने ०४ ते २१ जु.वा.किं.सू.६} सन १९५६ ते सन २०१६ पर्यंतचे सर्व महत्त्वाचे कार्यालयीन शासकीय कागदपत्रे जु.वा.किं.सू.ही सर्व महत्त्वाची कागदपत्रे चोरीस गेलेली आहेत.
ही कागदपत्रे टेम्पोतून भरून नेल्याचे वेंगुर्ले शहरात व तहसीलदार कार्यालयालय परिसरात बोलले जात आहे.ही महत्त्वाची कागदपत्रे गायब करण्यामागे मोठे रॅकेट असल्याची चर्चा वेंगुर्ले परिसरात बोलली जात असून, टेम्पो ही गायब झाल्याची चर्चा चर्चिली जात आहे.याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात मध्ये दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की,सदरचा हा चोरीचा गुन्हा २६ मे २०२३ रोजी ५ वाजता ते १ जून २०२३ रोजी ४-३० च्या कालावधीत घडला असल्याचे म्हटले आहे.