Home शिक्षण वेंगुर्ला तालुक्यात आसोली फणसखोल शाळा ज्ञानी मी होणार मध्ये प्रथम..!

वेंगुर्ला तालुक्यात आसोली फणसखोल शाळा ज्ञानी मी होणार मध्ये प्रथम..!

408

वेंगुर्ला: आज झालेल्या शालेय बाल कला क्रिडा व ज्ञानी मी होणार वेंगुर्ला तालुकास्तरावरीय स्पर्धेत आसोली फणसखोल शाळेचे विद्यार्थी कु. वीर मंगेश गावडे व कु. तन्वी सुनील गावडे या गटाने ज्ञानी मी होणार (लहान गट) मध्ये प्रथम क्रमांक पटकावून वेंगुर्ल्यात तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. आसोली फणसखोल शाळा जिल्हास्तरावर वेंगुर्ला तालुक्याचे दुसर्‍या वेळी प्रतिनिधित्व करणार आहे. पारितोषिक वितरण वेंगुर्ला गटशिक्षणाधिकारी मा. संतोष गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर विस्तार अधिकारी भाकरे मॅडम केंद्रप्रमुख कावळे मॅडम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. विनोद गावडे उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थांना मुख्याध्यापिका सुजाता देसाई मॅडम व उपशिक्षक प्रसाद गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे तालुक्यात होत कौतुक होत आहे.